नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नाशिक: ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक समितीचा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल सेलीब्रेटा, शिखरेवाडी, नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस मा. अॅड. नितीन ठाकरे, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे, नाशिकचे पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक, ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष मा. मंदाकिनी भोसले, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त मा. श्री. महेश चौधरी, मंत्राज् ग्रीन रिसोर्सेसचे डॉ. यु. के. शर्मा आणि वैध मापन शाखेचे उपनियंत्रक मा. अनिल गिरनारे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉ. आशा पाटील यांनी ग्राहक रक्षक समितीच्या वतीने करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवराचे
गुण गौरव करून ट्रॉफी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
ग्राहक रक्षक समितीचा हा सोहळा ग्राहकहितासाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित मान्यवरांनी समितीच्या उपक्रमांचे कौतुक केल..

