इचलकरंजी येथे सरिता मोरे आणि साहित्यिक मित्रांकडून भव्य सत्कार स्वागत आणि सन्मान.

0
63

सातारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सातारा येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो असता काल कराड आणि आज सांगलीतून नरसोबाची वाडी या कृष्णा नदीच्या काठावरील जाज्वल्य असलेल्या मंदिराकडे प्रस्थान केले.. तेव्हा इचलकरंजीहून सरिता मोरे यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की, आपण नरसोबाच्या वाडी पाशी आहात.. म्हणजे आमच्या इचलकरंजीच्या अगदी जवळ आहात. आणि तुम्ही इचलकरंजीला आले पाहिजे.. मी थोडीशी माहिती घेतली आणि त्यांना हो म्हणालो. आणि थेट इचलकरंजी गाठलं त्यांच्या शाळेची प्रचंड अशी धावपळ गॅदरिंगची सुरू असताना सुद्धा त्यांनी माझ्या येण्याचा प्रचंड असा स्वागत केलं. त्यांच्या गाडीने त्यांनी पूर्ण इचलकरंजी फिरवलं एवढंच नाही तर इचलकरंजी गावात या गावांमध्ये त्यांनी माझा जोरदार सत्कार केला स्वागत केलं सन्मान केला.. यावेळी त्यांचे सहकारी मित्र हरहुन्नरी कलावंत गायकीच्या आवाजातील बेताज बादशहा कवी लेखक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद कांबळे आणि सहकारी संजय संतोष गायकर सर सर्व मंडळी सोबत होती.या सर्वांनी सुंदर असे गाडीची सफर माझ्यासोबत केली एवढेच नाही तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माझे गोडर ही कादंबरी ज्या नाभिक समाजावर लिहिली आहे..त्या नाभिक समाजाचे त्यांचे सहकारी गायकर सरांना सांगून त्यांनी नाभिक समाज संघटनांना एकत्र करून नाभिक समाजाच्या वतीने माझा भव्य दिव्य असा सत्कार सन्मान केला.. तो मी कधीही विसरू शकत नाही. समाजाला माझ्याशी कनेक्ट केलं आणि मला या माझ्या हक्काच्या समाजाच्या समोर बोलण्यासाठी प्रवृत्त केलं असा दुहेरी हा कार्यक्रम त्यांनी इचलकरंजी मध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. केवळ भेटण्यासाठी म्हणून आलो आणि या सुंदर अशा भव्य दिव्य स्वागताने सन्मानानं मी भावनिक झालो. या साहित्याने दिलेली ही माणसं खूप प्रेम करणारी आहेत. जीवाला जीव देणारी आहेत किंवा निर्माण करणारी ही माणस आहेत या साहित्यिक मित्रांच्या प्रेमातून मी उत्तरही होऊ शकत नाही आणि सहज इचलकरंजी गाठले आणि हा सत्कार सन्माननीय स्वीकारलेला आहे..केवळ आमच्या येथे इचलकरंजीला या अस त्यांचं म्हणणं नेहमी असायचं मी त्यांना म्हणायचं की आमच्या नांदेडला या पण कोण आधी येतं किंवा कोणाच्या भेटी होतील सांगता येत नाही पण साताऱ्या कडे आल्यामुळे कराड आणि कराडहून सांगली आणि सांगलीहून इचलकरंजी ला आलो आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून प्रचंड असा आनंद झालेला आहे. त्यांनी केलेला सत्कार सन्मान घेणे आयुष्यात विसरू शकत नाही. मला अतिशय भावनिक करणार हा सन्मान होता.. माझ्या कलागुणांचे कौतुक करणारा हा सन्मान होता अशा या सन्मानाबद्दल सत्कार बद्दल आणि इचलकरंजीत मला बोलावल्याबद्दल समाजाशी भेटल्या बद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here