भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी जिल्हा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

0
54

भाजप सदस्य नोंदणी अभियान – कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे प्रतीक – भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक: २४ डिसेंबर २०२४ भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत ”सदस्यता नोंदणी अभियान – जिल्हा कार्यशाळा” आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारी सेलिब्रेशन फंक्शन हॉल, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाले..

कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, ज्येष्ठ नेते तथा विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भाजप सदस्य नोंदणी अभियान – कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे प्रतीक कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा पक्षाचा आधारस्तंभ आहे. भाजपची संघटना अधिक बळकट व्हावी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढावे, यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण आहे.

“गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या मेहनतीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केले. याच ऊर्जा आणि एकजुटीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही यश मिळवण्यासाठी प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे लागेल,” असे त्यांनी नम्रतेने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोहिमेची सुरुवात आणि पुढील दिशा:
देशभरात चालू असलेल्या भाजप सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील अभियानाची सुरुवात या कार्यशाळेद्वारे करण्यात आली. तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करून सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्यावी आणि अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केले.

या कार्यशाळेस मंचावर भाजपा ज्येष्ठ नेते तथा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश सदस्य रवींद्र ओलालवार, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, प्रकाशजी गेडाम, सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, डॉ.चंदा कोडवते, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ऍड.उमेश वालदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, विधी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक ऍड.विजय चाटे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यशाळेत सदस्यता नोंदणी मोहिमेचे सादरीकरण एलईडी स्क्रीनवर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेला गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यामुळे संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडले. या अभियानामुळे भाजपची ताकद वाढून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

सदरील कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हा भाजपच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here