खासदार धानोरकरांनी गाजविले लोकसभेचे हिवाळी अधिवेशन.

0
124

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडले. हे अधिवेशन विविध कारणांनी चर्चेत राहिले. विरोधकांनी विविध आयुधांच्या माध्यमातून संसदेत सरकार ला घेरण्याचा प्रयत्न केला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोसकभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्न व चर्चेच्या माध्यमातून सरकार ला धारेवर धरले होते. यामध्ये प्रामुख्याने उर्जा विभागाद्वारे सौर ऊर्जेच्या संदर्भात सरकार कडे विचारणा केली. त्यासोबतच, कृषी मंत्री यांना शेतकऱ्यांना तात्काळ कृषी पंपाकरीता विज देण्याकरीता काय उपाययोजना केल्या या संदर्भाने विचारणा केली. महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार कडे विविध प्रश्न विचारले. वित्त मंत्रालयाअंतर्गत खासदार धानोरकर यांनी मजुरांचा आर्थिक परिस्थितीसंदर्भात सरकार कडे विचारणा करुन देशातील मजुरांच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात चर्चा केली. विद्युत मंत्रालयाअंतर्गत जल विद्युत, पवन उर्जा यासंदर्भात देखील चर्चा केली. श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत अनुसूचित जाती, जनजातीतील बेरोजगार युवकांचा प्रश्न संसदेत मांडला. विधी व न्याय विभागाअंतर्गत न्यायालयीन शुल्क वृध्दी संदर्भात चर्चा करुन सरकार कडे विचारणा केली. त्यासोबच कृषी व कल्याण विभागाअंतर्गत किटकनाशकाद्वारे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यु संदर्भात सरकार चे लक्ष वेधले. ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याकरिता सरकार चे लक्ष वेधले. स्टील, कोळसा व खदान समिती अंतर्गत विविध प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सरकार चे लक्ष वेधले. शून्य प्रहरात देखील बी.एस.एन.एल. च्या महसुल वाढी संदर्भात विविध उपाययोजना करण्याच्या सुचना करीत या कंपनीच्या घसरलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 2023 च्या पिकविम्याचे हजारो शेतकऱ्यांचे पैसे थकीत असून ते तात्काळ मिळावे अशी आग्रही मागणी लोकसभेत केली.

खासदार धानोरकर यांनी हिवाळी अधिवेशनात अनेक प्रश्न व चर्चेत सहभाग नोंदवून जिल्ह्यातील विकासाच्या संदर्भात आक्रमकपणा दाखवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here