नितीन भटारकर यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे मागणी.
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क, चंद्रपूर :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. अनेक डॉक्टरांचा अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होत असते. त्यामुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुजू असलेल्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहावे या बाबत च्या स्पष्ट सूचना द्याव्या.
जिल्यातील आपल्या अखत्यारीत असलेल्या ज्या दवाखान्यात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी असेल त्याबाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्याचे पत्र मिळाल्यास सदर गंभीर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब यांच्या लक्ष्यात आणून देऊ व तात्काळ डॉक्टर उपलब्ध व्हावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न करन्यात येईल या संबंधाने आज जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन चर्चा केली.
सध्या सुरू असलेल्या वातावरणातील बदलांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फिरती आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी देखील आवश्यक उपाययोजना कराव्या या बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच विविध सामाजिक संघटने तर्फे ग्रामीण भागात आरोग्य निदान व तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते त्यांना देखील मार्गदर्शन व सुविधांसह सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिनव देशपांडे, भोजराज शर्मा, आशिष टक्कर, करण भालेराव, अमर गौंधर्य उपस्थित होते.

