पालघरमधील धक्कादायक घटना
पालघर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच दुसऱ्या मित्राशी संगनमत करून आपल्यां मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना जव्हार येथे घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत ही हत्या करण्यात आली आहे. नितीन सोमा अकणे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जव्हार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर जव्हारमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रीतीचा पारवा
वृत्तानुसार, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील दादरकोपरा येथील रहिवासी असलेला नितीन सोमा अकणे याचे त्याचाच मित्र असलेल्या सुभाष जाणू वायाळ याच्याशी भांडण झाले होते. नितीन सोबत झालेल्या भांडणाचा संपूर्ण प्रकार सुभाष वायाळ याने त्याचा मित्र सायवन वसंत मोरघा याला सांगितला. नितीनशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वचपा काढण्याचे दोघांनीही संगनमत करून ठरवले. त्यानुसार सुभाष याच्या दादरकोपरा येथील शेतात नितीन याला बोलावून त्याच्यावर कुऱ्हाडीने कानावर, गालावर, वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या नितीन याला उपचारासाठी प्रथम जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
,,https://prabodhininews.in/?p=43665,,,,
याप्रकरणी आरोपी सायवण वसंत मोरघा (वय 21) आणि सुभाष जानू वायाळ (वय 20) या दोघांविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 3 (5 )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

