प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अर्लीअन कवियों का अध्यात्म प्रा. लि. या कंपनी चे संस्थापक अध्यक्ष, युवा उद्योजक, मास्टर ट्रेनर डॉ सागर गुडमेवार यांच्या सुपीक डोक्यातून अशी कल्पना साकारली की, आपल्या कंपनीचे नाव सातासमुद्रापार झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्याचे ठरविले.
अर्लीअन कवियों का अध्यात्म प्रा. लि. कंपनीने नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतात पहिल्यांदाच ३१ डिसेंबर ला ऑनलाईन राष्ट्रगीताचे आयोजन व साहित्यिकांचा मेळा या शीर्षकाखाली लंडन बुक ऑफ वर्ल्ड करायचे ठरवले होते .
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर २४ रोजी रात्री ११.३० वाजता आदरणीय डाॅ. सागर गुडमेवार सरांनी गुगल मिटींग घेतली. ३१ डिसेंबर रोजी सर्व जण एकत्र येऊन इंग्रजी नव वर्ष साजरे करतात . पण *डाॅ . सागर सरांनी साहित्यिकांसाठी म्हणून लंडन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सेट* करण्याचे ठरवले.
यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून व भारतातून सर्व कार्यकारी सभासदांनी खूप मेहनत घेऊन सर्वांना एकत्र आणले.
आणि ही संख्या ११० च्या वर आपण क्राॅस केली आहे. याचे सारे श्रेय कार्यकारी टीम व प्रत्येक सभासदाचे आहे.
हे साहित्यिकांच्या बाबतीत पहिल्यांदाच होत आहे . ६० लोक लंडन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्यासाठी हवी होती . पण सर्व सारस्वतांनी आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्र मंडळीना सर्वांनाच हे रेकॉर्ड सेट करण्यासाठी आमंत्रित केले होते त्यामुळे ही संख्या 110 वर जाऊन पोहोचली.
बरोबर रात्री १२ वाजता लंडन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्यासाठी ११० च्या वर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. त्यावरून राष्ट्रप्रेम दिसून आले. आणि भारतीय इतिहासात पहिल्यांदाच हा आगळावेगळा रेकॉर्ड सेट झाला आहे.
अभिमानाने सांगायला आनंद होतो की हे भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे साहित्यिकांच्या कार्यक्रमाचे आगळे वेगळे आयोजन होऊन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
एकीकडे 31 डिसेंबर बरेच लोक साजरा करत होते तर दुसरीकडे हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकांनी यशस्वीरित्या पार पाडला.
यावरूनच आपणास कळते की आपल्या अर्लीअन ग्रुपच्या परिवाराची ताकद किती मोठी आहे.
नव्या वर्षाची खूपच दमदार सुरुवात जल्लोषात झाली.
या आनंद सोहळ्यात आम्हाला आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट मिळणार हा अवर्णनीय आनंद म्हणजे दुधात साखर पडली असा आहे.
“भारत माता की जय” च्या घोषणेने गुगल मीट दुमदुमली.

