प्रीत तुझी माझी
फुले फुला परी
अबोल ते शब्द
आले ओठावरी।।
लाजले ग डोळे
झुकली पापणी
थरथरी ओठ
अजाणतेपणी ।।
मनातले भाव
तुझ्या नयनात
तुझ्यासवे दिस
जाई आनंदात।।
भान नसे मज
असता तू पुढे
प्रेम दिसे मला
सांगू कसा गडे।।
स्वर्गाची अप्सरा
सुंदर तू परी
स्वप्नात आलीस
आता ये ना घरी।।
रोजच झुरतो
जीव तुझ्यावर
स्वरूप सुंदरी
दिसे नभावर।।
किती सांगू तुला
रोज प्रेम आहे
अंतरात माझ्या
प्रीती तुझी वाहे।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

