औस प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे- औसा : तालुक्यातील मौजे वरवडा येथे ग्रामपंचायत सदस्या निर्मला कांबळे यांनी गावातील गावठाण येथील जागा संविधान सभागृह तसेच बुद्ध विहार साठी औसा चे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी याचेंकडे निवेनाद्वरे मागणी केले .होते तर त्यांचाच मुलगा भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी गावाला स्मशनभूमी बांधून देण्यात यावी महणून यांनी ही तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी याचे कडे मागणी केली होती. या माय लेकराच्या मागणीच्या अर्जाची तहीलदारांसह गावातील प्रतष्ठित नागरिकांची बैठक बोलावली होती बैठीदरम्यान सर्वच्या साक्षीने तहसीलदार याचे दालनात संविधान सभागृह व बुद्ध विहार तसेच स्मशान भुमिसाठी जागा देण्याचा ठराव पारित करण्यात आला. व सदर दोन्ही जागेची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी गरगटे. मॅडम. ग्राममहसुल अधिकारी कुलकर्णी.ग्राम पंचायत अधिकारी कांबळे डी.सी यांचे सह गावातील नागरिक व अर्जदार निर्मला कांबळे. सिद्धार्थ कांबळे. मोतीराम कांबळे
,हरिनंद यादव, कांबळे,मरिअप्पा , मधुकर गवळी, विलास कांबळे, मधुकर कांबळे, चंद्रकांत कांबळे, सोमनाथ कांबळे, हणमंत कांबळे, संतोष कांबळे, महादेव लुंगशे, दयानंद डूमणे, बालाजी चव्हाण, दत्तात्रय कांबळे, भगवान कांबळे,बंकट बोडके यांच्या उपस्थितीत स्थळ पहाणी करून दलित वस्ती गावठाण मधिल 300बाय 200स्के फुट ज्याची चतुःसिमा पुर्वेस भादा रस्ता, पश्चिमेला गोविंद गवळी, दक्षिणेस मधुकर गवळी, व उत्तरेस शिवली पानंद रस्ता वरिल चतुःसिमेची असलेली जागा संविधान सभा गृह या कामासाठी देण्यास हरकत नाही असा पंचनामा केला व पुढील कार्यवाही करण्यासाठी काही हरकत नाही आ
तसेच दि.12/ डिसेंबर/2024रोजी या.तहसिलदार औसा यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार मौ. वरवडा येथील सार्वजनिक स्मशानभूमी साठी जुन्या गावठाणची जागा उपलब्ध आहे त्यामध्ये दक्षिणेला वरवडा-शिवली पाणंद रस्ता असून, दोन मोठे चिंचेचे झाडे आहेत बाकी तिन्ही सिमांना शिल्लक गावठाण आहे.मोठया चिंचेच्या झाडापासून पुर्वेस 10 गुंठे एवढी जागा स्मशानभूमी साठी स्थळ पहाणी करून,सदरिल जागेवर ग्राम पंचायतीने स्मशानभूमी शेडचा प्रस्ताव तयार करून शेड बांधून द्यावे असे ठरले. अशाप्रकारे पंचनामा करून कार्यवाही करण्यात आली आहे…

