क्रांतीज्योती सावित्रीबाई चे विचारधन महिलोन्नती प्रेरक – ॲड. सारीका जेनेकर

0
52

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क- ऊर्जानगर (चंद्रपूर):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुलेंनी समाजशिक्षक म्हणून प्रेरणादायी कार्य केले, सावित्रीबाईचे जीवनसंघर्ष, त्यांनी चालविवेली चळवळ अमुलाग्र बदल घडविणारी असून आजची प्रासंगीकता व जबाबदारी चे दर्शन घडविते त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चे विचारधन महिलोन्नती करीता प्रेरक आहे असे मत ॲड.सारिका जेनेकर यांनी व्यक्त केले त्या श्रीगुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने “स्नेहबंध” सभागृह ऊर्जानगर वसाहत येथे आयोजित वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजाचा ५६ व्या व वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा ६८ व्या स्मृतीदिन महोत्सवानिमित्य आयोजित महिला संमेलन या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.डाँ संगिता बोदलकर वैद्यकीय अधीक्षक सी एस टी पी एस यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती समारोह संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अतिथीच्या हस्ते दिप प्रज्वलन,अधिष्ठानाला व प्रतिमेला माल्यार्पण करून मंडळाच्या चमुनी स्वागत गीतानी झाली.
कार्यक्रमास उदघाटक सरस्वता धमाणे माजी अध्यक्षा,प्रमुख वक्त्या ॲड.सारिका हिरदेवे/जेनेकर व संगिता धोटे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून एकता मेश्राम सहकार्याध्यक्ष क्रां.जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शितल चव्हाण व सविता हेडाऊ महिला अध्यक्षा श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ज्योती दरेकर यशस्वी उद्योजिका याची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व पाहुण्यांचे ग्रामगीता व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

संगिता धोटे यांनी राजमाता जिजाऊ यांचा जीवन संघर्ष व आजची प्रासंगीकता व आपली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले, यावेळी सरस्वता धमाणे व शितल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाँ. संगिता बोदलकर यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांना प्रगती ही व्रतवैकल्य व उपवास करून न होता शिक्षणातूनच झाली म्हणून जुन्या रुढी परंपरा बाजूला करून परिवर्तनवादी विचार अंगिकरावे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरिता बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा कन्नमवार व माधवी बोरकर यांनी केले तर आभार मनिषा आवारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here