भूमिपुत्र महिला ब्रिगेड व मुक्ता युवा वाहिनी बल्लारपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमा ने क्रांतीज्योती सावित्री आई फुले व मां फातिमा शेख यांची जयंती साजरी

0
44

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – आज 3 जानेवारी 2025 ला भूमिपुत्र महिला ब्रिगेड व मुक्ता युवा वाहिनी बल्लारपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमा ने बल्लारपूर येथील गोडवाना नृत्य सभागृह येथे क्रांती ज्योती सावित्री आई फुले व मां फातिमा शेख यांच्या जयंती निमित्य संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला,या कार्यक्रमास उदघाटक म्हणून लाभलेल्या माननीया डॉ रजनी हजारें, माननीय प्रकृती पाटील मॅडम अंधश्रद्धा निर्मूलन, कविता मडावी मॅडम, तबससूम अन्सारी,कार्क्रकमाच्या अध्यक्ष्या डॉक्टर अभिलाष्या गावतुरे मॅडम, सविता पवार, फातिमा तनवीर अली, वनिता रायपुरे, अनिता पंधरे, डॉक्टर शालिनी मटाले, डॉक्टर ज्योती डांगे, ऍड. प्रिया झांबरे, रश्मी बारसागडे, रोजीदा ताजुद्दीन शेख, ऍड. रोहिनी कुळमेथे उपस्तित होत्या प्रथम सावित्रीआई फुले व मां फातिमा शेख यांच्या फोटोला पुष्पहार वाहून व सर्व महापुरुष्या च्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केल्या गेले नंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्या गेले,प्रास्ताविक भाषण अमोल वर्मा यांनी केले,डॉ रजनी हजारें मॅडम याची स्त्रियांना संबोधले, तब्ससूम अन्सारी प्रिंसिपल मॅडम यांनी आजची स्त्री यावर बोलल्या, कविता मडावी मॅडम यांनी स्त्री व आजची आव्हाने या विषयावर मत मांडले, नंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांना त्यांच्या केलेल्या कार्यास प्रोत्साहन म्हणून भूमिपुत्र ब्रिगेड यांचे कडून शॉल व सन्मान चिन्ह देऊ केले,मुलींनी नाटक आणि नृत्य सादर करून उपस्थिताचे मन ओढून घेतले, अध्यक्षिय भाषणात डाॅ गावतुरे यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्यास व आजची आव्हाने पेलण्यास सक्षम व्हा असे सांगितले, अध्यकक्षीय भाषण झाले व आभार प्रदर्शना नंतर हा कार्यक्रम इलेच संपला हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवि देवगडे यांनी केले,ताहीर हुसेन,अमोल वर्मा, अतिक शेख, साजिद शेख, अनिस खान, पुजा मून, छब्बू खोब्रागडे, देशभ्रतार, संध्या कोरडे, निशिगंधा ढेंगरे, हर्ष्या ढेंगरे, प्रणाली ढोके, करुणा शेगावकर, तंजीला सय्यद, संजीदा बाजी, अर्शीया बाजी, लता नागोसे, पूजा मोहुर्ले, वैशाली चिवंडे
आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here