
पत्रकार असतो
खरच महान
सर्वत्र बातमी
देतो किती छान।।१।।
पत्रकार असे
चौथा हाच स्थंभ
जीवनी भरतो
सूंदर हे रंग।।२।।
करतो रक्षण
जनतेही छान
म्हणून पत्रकार
खरच आहे महान।।३।।
समाज सेवा करतो
माहिती सर्वत्र देतो
लोकशाहीचा आधार
म्हणून कार्य करतो।।४।।
सत्य नेहमी आणतो
सर्व जगा समोर
पत्रकार आहे म्हणून
जगाला नाही घोर।।५।।
पत्रकार सुरक्षित रहावा
हीच मनोमन इच्छा
पत्रकार दिनाच्या सर्वांना
मनोमन हार्दिक शुभेच्छा।।६।।
प्रा .समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर












