अवैध मुरुम वाहतूक प्रकरणी ट्रक जप्त

0
71

आलापल्ली-लगाम मार्गावर कारवाई

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक मिरालवार 8830554583 – गडचिरोली- रस्ता बांधकामाकरिता अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करुन वाहतूक करीत असल्या प्रकरणी अहेरी तालुका प्रशासकीय पथकाने हायवा ट्रक जप्त करण्याची कार्यवाही मंगळवारी, (दि.7) दुपारच्या सुमारास पार पाडण्यात आली. तालुका महसूल कार्यालयाच्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या मुरुम उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिरोंचा – आलापल्ली या 353 राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली- लगाम मार्गाचे काम सुरु आहे. या रस्ता बांधकामाकरिता मुरुम वाहतूक केली जात आहे. मंगळवारी दुपारी एमएच 36 एए-8499 क्रमांकाचा हायवा ट्रकने या मार्गावर मुरुम वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. अहेरी तालुका कार्यालयाच्या पथकाने सदर ट्रक थांबवून चालक शिवप्रसाद साहू याचेकडे मुरुम वाहतूक तसेच उत्खननाचा परवाना मागितला असता संबंधित चालकाने परवाना दाखविला. मात्र सदर परवाना बेकायदेशीर असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अवैध मुरुम वाहतूक प्रकरणी मुरुमाने भरलेला हायवा ट्रक तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या हायवा ट्रक स्वामी समर्थ इंजिनअर्स लिमीटेड, पुणे या कंपनीचे असल्याची माहिती आहे. अहेरी महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध मुरुम उत्खनन, वाहतूक करणा- यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here