सिटी कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती सोहळा उत्साहात सुसंपन्न

0
82

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आदर्श शिक्षिका आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी २०२५ रोजी सिटी कन्या विद्यालय चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रस्तूत जयंती सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आद. प्रतिमा नायडू मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनात विविध क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आनंद मेळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते, त्यानिमित्त बक्षीस वितरण सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले, प्रस्तूत कार्यक्रमाचे उद्घाटन आद.वसुधा रायपूरे यांनी केले.

तसेच प्रस्तुत कार्यक्रमाला चांदा शिक्षण मंडळाचे सचिव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. पुल्लावर यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक आद. प्रभावती एकूरे, अॅङ वैशाली टोंगे, रमेशकुमार सिंग, मनीष सिंग, विजय देव, आणि चांदा शिक्षण मंडळातील विद्यालयाच्या सर्व मुख्याध्यापीका तसेच पालकवर्ग यांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रस्तूत कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवान विद्यार्थ्यांनीना मेडल पुरस्कार राशी प्रमाणपत्र आणि काही भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आद. नायडू यांनी उत्तमरीत्या सादर केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद. शीतल तायवाडे मॅडम यांनी उत्तमरीत्या सादर केले, सांस्कृतिक विभागाचा भार आद. कोटेवार मॅडम यांनी उत्तमरीत्या सांभाळला, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आद. पतरंगे सरांनी उत्तमरीत्या केले, प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले प्रस्तूत कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नायडू, शिक्षिका तायवाडे, कोटेवार, उपासे, हजारे, पतरंगे, चव्हाण, प्रसाद बाबू, धांडे तसेच विद्यार्थ्यांनीनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here