धम्मध्वज सत्याचा साक्षी
मानवतेची शिकवी भाषा
करुणेची ज्योत उजळत
नव्या युगाला दाखवतो दिशा…
धम्मध्वजाच्या सावलीत
माणसा मिळतो सन्मान
शांतीचा पाठ शिकविणारा
जगभर देई अजरामर ज्ञान…
न्याय करुणा समतेची
धम्मध्वज देतो दिशा
भेदभाव नष्ट करून
जगाला दावतो आशा…
धम्मध्वजाचा सन्मान मार्ग
अज्ञान अंधाराला तोडतो
समतेच्या प्रकाशात नाहून
मानवतेचे शिखर गाठतो…
धम्मध्वज बौद्धांचा राहील
सदासर्वदा अभिमान
शांतता करुणेचा संदेश
जगास देईल समाधान…
धम्मध्वज उंच फडकून
शांतीचा संदेश पोहचूदे
मनी माणुसकी वात फुलत
धम्माचा दीप तेवत राहूदे…
धम्मध्वजाच्या दिवशी
समृद्धीची धरून कास
मानवतेच्या दिव्यातून
उजळेल जीवनी आस…
कवयित्री संध्या रायठक/धुतडे
शिक्षिका, नांदेड

