जिवलग मैत्रिणींची मैत्री
मनाला जोडून ठेवणारी
सुख दु:खाच्या क्षणी
हसतखेळत साथ देणारी…
नंदीग्राम ट्रेनमध्ये मैत्रिणींच्या
गप्पांना येतो मस्त बहर
रुसव्या फुगव्यात हळूच
भांडण्याचा होतो कहर…
मैत्रिणींच्या खोड्या
आमचे असतात हट्ट
एकत्र असल्यावरच
मैत्रीचे बंध जुळे घट्ट…
मैत्रिणींच्या सहवासाची
साठवण असते मनात
मैत्रिणीं आम्ही राहतो
एकमेकींसाठी ह्रदयात…
डोंगराएवढे प्रश्न असलेतरी
भासतात नेहमी लहान
मैत्रिणींच्या हास्यानेच
मोकळे होते आसमान…
मैत्रीत कधी रुसवे
तर असते मनधरणी
मनाच्या गाभाऱ्यात
कायमस्वरूपी मैत्रिणीं…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

