लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथील इयत्ता सहावीमधील ८० जागांच्या प्रवेशासाठी १८ जानेवारी २०२५ रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील ३६ परीक्षा केंद्रांवर ही प्रवेश परीक्षा होईल. प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेवेळी या प्रवेशपत्राची प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्रावर १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथे सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर लातूर नवोदय विद्यालय प्रभारी प्राचार्य संजय बडवे यांनी केले आहे.

