लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, ११ जानेवारी २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील हे ११ जानेवारी रोजी सकाळी शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी १०.३० वाजता चाकूर तालुक्यातील महाळंगीकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता पद्माकर तात्यासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. त्यानंतर शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव. दुपारी १.३० वाजता ना. पाटील हे अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे लव्हराळे मंगल कार्यालयाजवळ सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करतील. दुपारी २ वाजता राखीव. दुपारी ३ वाजता किनगाव येथे हजरत पीर गैबीबाबा उरुस यात्रेला उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.
ना. पाटील हे सायंकाळी ६.३० वाजता अहमदपूर तालुक्यातील थोडगा रोडकडे प्रयाण करतील. सायंकाळी ७ वाजता थोडगा रोड येथील नोबेल नॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यांनतर सोयीनुसार शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.

