गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न

0
126

गोंदिया प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विधानसभा महायुतीच्या विजयाचे श्रेय खासदार प्रफुल पटेलजी व मोलाचे योगदान देणारे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शहर अध्यक्ष नानू मुदलियार व शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी गोंदिया शहर कार्यकारिणी जाहीर करून यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले.

शहराचा विकास व प्रगती साठी पक्ष कटिबध्द असून आगामी काळात प्राधान्याने कार्य करेल. गोंदिया शहरातील प्रत्येक वॉर्डांत जावून पक्ष वाढीसाठी पक्षाची विचारधारा पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन राजेश दवे व आभार खुशाल कटरे यांनी मानले.

सर्वश्री राजेन्द्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, नानू मुदलियार, विनीत सहारे, प्रेम जैसवाल, राजू एन जैन, प्रवीण बैस, राजेश दवे, जयंत कछवाह, हरगोविंद चौरसिया, राजेश वर्मा, हरिराम आसवानी, महेश करियार, संजय शर्मा, नागों बंसोड़, विनायक शर्मा, लखन बहेलिया, संजीव राय, विनायक खैरे, संजीव बापट, एकनाथ वहिले, अशोक चूटे, मनोज जोशी, प्रमोद कोसरकर, रमेश कुरील,तुषार उके, दीपक कनोजे, मुन्ना अवस्थी, सौरभ जैसवाल, सि बिसेन, राहुल वालदे, गणेश डोये, सुनील पटले, सुशिला पोरचेटिवर, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथडे, दीपक मूलचंदानी, धीरज मोटवानी, जितेंद्र तिवारी, नितिन मेश्राम, संजय सोनुने, शैलेश टेम्भेकर, वामन गेडाम, यादवराव बिसेन, बालू मेश्राम, अनुज चंदेल, रौनक ठाकुर, अमन घोडीचोर, कनक दोनोडे, अमित चौहान, रमाकांत मेश्राम, श्रेयष खोब्रागडे, खालिद पठान, लव माटे, अभिषेक दिप, हर्षा दिप, लकी खोब्रागडे, हिमांशू महावत, चिराग दिप, निशांत दिप, चंगेश नेताम, मनीष कापसे, गौरव शेन्डे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here