सरपंच आणि सचिव यांचेवर कारवाई करण्याची उपसरपंच यांचेसह अन्य सदस्यांची मागणी
जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
मो.9665175674
पवनी तालुक्यातील अड्याळ ग्राम पंचायतचे सरपंच आणि सचिव हे स्वतः ठेकेदारी करीत असून शासनाच्या विविध योजने अंतर्गत सुरु असलेले विकास कामाचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे आहे.सुरु असलेल्या विकास कामाची सखोल चौकशी करून सरपंच आणि सचिव यांचेवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अड्याळ ग्राम पंचायतचे उपसरपंच शंकर मानापुरे, सदस्य पंकज ढोक,जाबू शेख आणि अन्य सदस्य यांनी गट विकास अधिकारी पवनी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अड्याळ ग्राम पंचायत अंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गिरडकर ते राहुल नाली,सुभाष गभणे ते कुसन गभणे,राजू पवार ते गोपाल ढोक,नागपुरे ते निकुळे ( नाली बांधकाम), गुजरी चौक येथील भाजीपाला दुकानासाठी ओठे बांधकाम सुरु आहे.हे सर्व बांधकाम सिमेंटचे असून निकृष्ठ दर्ज्याचे असल्याचा आरोप उपसरपंच आणि अन्य सदस्य यांनी केला आहे.त्याचप्रमाणे जमा करण्यात आलेला पाणीकर आणि घरकर त्याच दिवशी बँकेत जमा न करता परस्पर खर्च करीत असल्याचा आरोप सुद्धा सरपंच आणि सचिव यांचेवर केलेला आहे.विकास कामाच्या संदर्भात केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून उपसरपंच शंकर मानापुरे,सदस्य पंकज ढोक,जाबू शेख,देवदास नगरे,आशिक नैतामे,सदस्या पुष्पमाला कोहाड,ज्योती कुंभलकर, छाया तलमले,रुबीना सय्यद,शिल्पा गभणे यांनी केली आहे.निवेदनाच्या सत्यप्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा,जिल्हाधिकारी भंडारा,आमदार नरेंद्र भोंडेकर,पोलीस अधिक्षक भंडारा,तहसीलदार पवनी,ठाणेदार पोलीस स्टेशन अड्याळ यांना सुद्धा देण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच शंकर मानापुरे,ग्राम पंचायत सदस्य पंकज ढोक यांनी दिली.

