प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई समाजभूषण पुरस्कार 2025 साई च्या पावन भूमीत शिर्डीत कु. सायली बाळू ढेबे यांना कलाक्षेत्र, सामाजिक क्षेत्र,पत्रकारिता, साहित्यिक क्षेत्र तसेच अभिनयक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी मुळे देण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास बॉलिवूड अभिनेत्री मा. चित्रा दीक्षित, समाजभूषण मा.किशोर कालडा शेठ संगमनेर, संस्थापक अध्यक्ष मा. सुदाम संसारे, उपाध्यक्ष मा.वंदना गव्हाणे, सल्लागार मा. डॉ. अजय वारुळे अश्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार शिर्डीत पार पडला.

