भीमसैनिकांचा ऐतिहासिक अभिमानास्पद उपक्रम – डॉ. रवींद्र जाधव, कल्याण

0
64

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परभणीच्या जातीय दंगलीत, सोमनाथ सूर्यवंशी हे भीमसैनिक शहीद झाले. त्यांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींना दहा लाख रुपयांचा सामाजिक न्याय निधी जाहीर केला. परंतु त्या मातोश्रींनी तो स्वाभिमानपूर्वक नाकारला.

यानंतर सर्व भीमसैनिकांनी एकत्र येऊन संघर्ष निधी – सोमनाथ सूर्यवंशी मदत समूह स्थापन केला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींना मदतीचा हात पुढे केला. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान ठरली आहे. भीमसैनिकांनी दाखवलेला स्वाभिमान समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतो.

महाराष्ट्र कन्या, भीम कन्या, आणि डॉ. रवी कन्या ऋतुजा अहिरे यांच्या पुढाकारामुळे आपण सर्वजण एकत्र आलो आणि या ऐतिहासिक कार्याचा भाग होण्याची मला देखिल संधी मिळाली. या उपक्रमात आपण सर्वांनी मिळून *एक लाख रुपये* जमा केले. आज, 15 जानेवारी 2025 रोजी, परभणी येथे जाऊन ती रक्कम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींना सुपूर्द करण्यात येणार आहे. ही घटना समाजातील एकतेचे आणि मानवतेचे सुंदर उदाहरण ठरली आहे.

मित्रहो, आपल्या एकत्र येण्यामुळे आपण एक ऐतिहासिक कार्य उभे केले आहे. हे कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. संविधान सैनिक म्हणून आम्ही नेहमीच समाजहितासाठी आपल्या सोबत राहू.

आता समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे. राजकारणापासून दूर राहून बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणे, सामाजिक स्तरावर एकमेकांना आधार देणे, आणि एकजुटीने कार्य करणे हीच आजची खरी गरज आहे.

या ऐतिहासिक कार्याची दखल महाराष्ट्राने घ्यावी यासाठी संविधान सैनिक चॅनलद्वारे या उपक्रमाची माहिती प्रसारित करण्यात येईल. हा प्रेरणादायी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here