ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नरेंद्र महाराज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन

0
48

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : नरेंद्र महाराज संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी उपस्थितांना संबोधित करताना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो.”

या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिबिरादरम्यान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगली व्यवस्था ठेवली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक व मान्यवरांनी नरेंद्र महाराज संस्थेचे कौतुक केले.
त्या प्रसंगी डॉ. भोसे साहेब, डॉ. मिसार साहेब,डॉ.मुकुंद ढबाले,जिल्हा निरीक्षक गडपयाले साहेब,सुनील निकम,सोमेस्वर पत्रे, विजय पिल्लेवान,कैलाश वानखेडे,कविता कुथे,वर्षा नवघडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here