प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – स्थानिक विकलांग सेवा संस्था शिवभोजन केंद्रात अलीकडेच भोजन लाभार्थी ह्यांना तीळसंक्रांत सणा निमित्याने उपस्थिताना तिळगुळ लाडूचे वितरण करण्यात आले तसेच चंद्रपूर इन्स्पायरचे श्रीमान प्रा. विजय बदखल तसेच इन्शुरन्स कम्पनी अधिकारी संजीवनी कुबेर ह्यांचे द्वारा दोन गॅस शेगडीचा स्वीकार करण्यात आला तर कर्क रोगासोबत संघर्ष करून आरोग्य अबाधित राखणारे उद्योजक विलास कोळसे ह्यांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा सत्कार करण्यात आला.
लाडू साहित्यासाठी चंद्रपूर सुकन्या व सौन्दर्य स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या शीतल बावणे ह्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले तसेच लाडकी बहीण व आहार व बाल संस्कार मार्गदर्शक नंदा बिहाडे, स्वयंसिद्धा बचत गट सचिव राजश्री शिंदे ह्यांच्या चंद्रपूरला श्यामा प्रसाद वाचनालय सभागृहात पत्रकार संघातर्फे झालेल्या सत्कारा बद्दल विषेक कौतुक करण्यात आले .
कार्यक्रमास हॉटेल राजवाडा व्यवस्थापन प्रमुख अशोक बिहाडे, श्रीराम पान्हेरकर, खुशाल ठलाल, सीमा दुपारे, वृंदा बेरशेट्टीवर, अश्विनी कन्नाकेची विशेष उपस्थिती लाभली होती असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.

