आमदार रामदास मसराम यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांची घेतली भेट

0
52

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – तालुका देसाईगंज येथील मौजा चिखली/रिठ येथे राहणारे पुंडलिक रघुनाथ खरकाटे (वय 55) व भागवत हरीजी ठाकरे (वय 65) या दोन नागरिकांना कर्करोग झाल्याचे समजल्यावर आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

या भेटीत आमदार मसराम यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार दिला. तसेच उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आणि शासकीय योजनांमधून सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

रुग्णांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांबद्दल माहिती दिली आणि त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश देणार असल्याचे सांगितले. व N C I चे डॉक्टर देशमुख यांच्या सोबत दूरध्वनीच्या वतीने संपर्क साधून चर्चा केली.

या प्रसंगी त्यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने रुग्णाला सकारात्मक ऊर्जा आणि आधार देण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या भेटीमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here