चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘पेरते व्हा’ कवितेला पुरस्कार

0
45

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सावंतवाडी येथील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या “ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर, पुणे पुरस्कृत उत्कृष्ट कवितास्पर्धा -२०२४” मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या “पेरते व्हा” या कवितेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “आरती” मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रमाणपत्र व दिवाळी अंक भेट अशी असून वरील कविता आरती दिवाळी अंक- २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संस्थेच्या कथा व कविता लेखन स्पर्धेत चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘श्रृंखला’ या कथेस द्वितीय क्रमांकाचे व ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले होते.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, नरेश बावणे, उपसंपादक देशोन्नती, व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here