चांदण्याची रात आहे
मिलनाची ही उमंग
या इथे अन् त्या तिथे
बहरलेले प्रेमरंग
का कशास हे विराणे
आपण दोघे गावू तराणे
काळोखात चांदवा हसतो
तूझ्या मोहक गाली
धुंद मारवा छेडीत जातो
ओठावरील लाली
त्या ओठांवर झुलते फुलते
प्रणयाचे गाणे
ह्रदयामधल्या अनुरागाची
शपथ तू घेतांना
जन्मभराची साथ देईन
वचन तू देतांना
तूझ्याचसाठी जगणे मरणे
का कशास हे विराणे
कवयित्री वैशाली वागरे भुक्तरे
पालीनगर नांदेड

