मनिम्याऊ मनिम्याऊ
दूध देऊ तिच्यासोबत खेळू
निरागस प्राणी हा
फार सुंदर दिसे
बघताच क्षणी तिचा
लळा मुलांना लागे
दोन डोळे दोन कान
चार पायांची चाल
काळ्या नी पांढऱ्या रंगात
शोभून दिसे तीचे गाल
उंचीवरून उडी मारी
दूध चोरून चोरून पीई
उंदीर मामा दिसताच
धाव तिकडे घेई
तिचे दात मोठे बाण
डोळे निळे चमकदार
अंधारात चमकतो
जसा काजवा छान
मुलांची आवडती
मनिम्याऊ भारी
गुपचूप येऊन बसते
आपल्या मांडीवरी
घरातली ती लाडकी
सोबत सोबत राही
अंगावरून हात फिरवताच
लाडात मोठी येई…..
मनिम्याऊ मनीमाऊ …
कवयित्री संगीता राजेश नागदिवे.. सना
यवतमाळ

