‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमास १० वर्ष पूर्ती निमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रम संपन्न

0
61

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 22 – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतींना प्रतिबंध करण्यासाठी तसेच, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ (BBBP) या उपक्रमाला दि. २२ जानेवारी, २०२५ रोजी दहा वर्ष पूर्ण होत असल्याने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज विषेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाला दहा वर्ष पुर्ण होत असून स्त्रियांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

“मी प्रतिज्ञा करते / करतो की, मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेल व स्त्रीभ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करण्याऱ्यांचा विरोध करेन. मी मुलीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी सदैव कटीबध्द राहीन. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओं’ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होवून अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहीन.” ही सामुहिक शपत यावेळी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here