चिचखेडा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा: मुल संघाने पटकावला विजेतेपद

0
114

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण संपन्न

रविंद्र मैंद ब्रहापुरी तालुका प्रतनिधी प्रबोधिनी न्युज – चिचखेडा येथील युवा क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित आमदार चषक भव्य रबरी बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 5 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना चिचखेडा आणि मुल संघांमध्ये रंगला. या रोमांचक सामन्यात मुलच्या संघाने चिचखेडा संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत चिचखेडा संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर ब्रम्हपुरी संघाने तृतीय स्थान पटकावले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाला ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून थानेश्वर कायरकर मा.प.स.सदस्य ब्रम्हपुरी,मनोहर गजबे मा.कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी,संजना घुटके सरपंच चिचखेडा, लोकेश चौके उपसरपंच चिचखेडा,नितीन गजबे उपसरपंच कळमगाव,मने साहेब ग्रामसेवक,भास्कर राऊत,प्रणाली नन्नावरे ग्रा.प.सदस्या, विलास जांभुळे पो.पा, प्रशांत उरकुडे, वैभव राशेकर, उमेश मानकर, एकनाथ मंडलवार, राजेंद्र मरसकोल्हे, यशवंत मानकर, संदीप नहाले, धनराज मांदाले, संजय घुटके, अतुल चौधरी, पितांबर शेंडे, मातेरे शिक्षक, महादेव ननावरे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
बक्षीस वितरणप्रसंगी प्रमोद चिमूरकर यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा स्पर्धा स्थानिक तरुणांना संतुलित आणि सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करतात. तसेच ग्रामीण भागात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासोबतच खेळाच्या माध्यमातून सामाजिक साक्षरता वाढवणे आणि तरुणांच्या कौशल्याला चालना देणे हा या स्पर्धांचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत विजेत्या संघाला 41,000 रुपये रोख, उपविजेत्या संघाला 30,000 रुपये रोख, तर तृतीय स्थान मिळवणाऱ्या संघाला 17,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट किपर, बेस्ट कवरड्राइव्ह, प्रथम हॅट्रिक, बेस्ट फिफ्टी आणि बेस्ट अंपायर असे विविध वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले.
ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धेचा आनंद घेतला. आयोजकांनी उत्कृष्ट नियोजनाने या स्पर्धेला यशस्वी बनवले. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळण्यास मदत होते, यावर सर्व उपस्थितांनी एकमत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here