जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
9665175674
भंडारा – जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित गुप्ता प्राथमिक शाळा अड्याळ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 23 जानेवारी ते 24 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोज गुरुवार ला वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी 11 : 00 वाजता अड्याळ ग्राम पंचायतचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचे हस्ते,संस्था अध्यक्ष हरिहर कुर्झेकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उल्हास हरडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सीमा गिरी , संस्था सचिव विपिन कुर्झेकर,माजी मुख्याध्यापक अनिल हरडे , उपसरपंच शंकर मानापुरे , संस्था कोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण देशमुख , उपाध्यक्ष ममता खंडाईत , शिक्षणतज्ञ पुरुषोत्तम घारगडे, ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पंकज वानखेडे , अनिल शेंडे, खुशाल गभने , रुचीताई लारोकर ,सपना काटेखाये तसेच ज्येष्ठ नागरिक शरद शिवरकर उपस्थित राहतील .दुपारी 12:00 वाजता प्रेक्षणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 03 : 00 वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवार ला वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण सकाळी 11:00 वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र हजारे ,संस्था कोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर , केंद्रप्रमुख रोशन इडपाते तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होईल.त्यानंतर विद्यार्थ्यांकरिता स्नेह भोजना चे आयोजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.
गुप्ता प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा ढेंगे , सहाय्यक शिक्षक नितीन वाणी ,सहाय्यक शिक्षिका सुरेखा ढवळे, सहाय्यक शिक्षिका स्वाती भोवते, विद्यार्थी प्रतिनिधी मानस खंडाईत तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कु .एलसिवा मिंज यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

