प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अगदी वयाच्या १६ व्या वर्षी या विद्यार्थिनीने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळवलेले आहे.
या विद्यार्थिनीचे पूर्ण नाव आस्था उदेभान गणवीर असे असून ती सध्या इयत्ता 12 वी सायन्स,खात्री महाविद्यालय इथे शिकत आहे.
नुकत्याच ऑनलाईन घेण्यात आलेल्या जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी या विषयातील तिने पेशी (cell) या विषयावर प्रभावी प्रचार प्रसिद्धी केली असून या स्पर्धेत तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला हे कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की ही आमच्या जिल्ह्याची विद्यार्थिनी आहे .
ही स्पर्धा 3 जानेवारी २०२५ ला ऑनलाईन घेण्यात आली. आस्थाच्या यशाबद्दल तिचे बायोलॉजी चे शिक्षक सी.एन. डोंगरवार तसेच इतर शिक्षक व तिचे आई वडील यांनी तिचे कौतुक केले. संपूर्ण जिल्ह्यातून आस्थाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून पुढील वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

