आप बल्लारपूर तर्फे “एकतेच्या मशाल महोत्सवाची” जय्यत तयारी

0
115

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ आम आदमी पक्षातर्फे मागील चार वर्षांपासून “एकतेची मशाल महोत्सव” साजरा करण्यात येत आहे.
हे आयोजन दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिनी साजरा करण्यात येतो परंतु 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची रणधुमाळी असल्याने हा महोत्सव 26 नोव्हेंबर ला न घेता 26 जानेवारीला घेण्यात येत आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून “मशाल यात्रा” काढून सर्व धर्मगुरूंच्या हाथाने एकतेची मशाल पेटवून कार्यक्रमाची शुभारंभ करण्यात येणार आहे. व दर वर्षी या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचे कलम हस्तलेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येते आणि स्पर्धेत आलेल्या आर्टिकलचे कार्यक्रम स्थळी प्रदर्शनी लावण्यात येते. व समाजिक एकता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कव्वाली व कीर्तन सारखे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. यंदाच्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त साजरे होणारे “एकतेची मशाल महोत्सव- वर्ष ४थे” या कार्यक्रमात स्टार प्रवाह छोटे उस्ताद -03 फेम गायिका “अंजली गलपाळे” (वय ११) हि देशभक्ती गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यगाथा व भीम गीतांचे गायनाचे सादरीकरण करणार आहे . तरी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी सर्व बल्लारपूर शहरातील जनतेला आवाहन केले आहे की एकतेची मशाल महोत्सवात येऊन जनतेने एकतेची मशाल पेटवून सर्व धर्म समभावाचे संदेश अजरामर करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here