जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्र अंतर्गत येत असलेल्या केसलवाडा येथील तथागत विद्यालय येथे दि. 26/1/2025 रोज रविवार ला 76 वा प्रजासत्ताक दिन( संविधान अमृत महोत्सव वर्ष )साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच धनराज वलके,उपसरपंच भीमराव बारसागडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद गजभिये,माजी सरपंच कवळू फुंडे, पत्रकार तथा युवाक्रांती फाउंडेशन( महाराष्ट्र राज्य )चे संथापक अध्यक्ष जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरकर आणि प्रमुख अतिथी यांनी महात्मा गांधी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांचे पूजन करून माळ्यार्पण केले.त्यानंतर श्री.सावरकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.ह्याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सदर केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर सावरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पालक वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रदीप गोंडाने यांनी केले.तर आभार सांस्कृतिक विभाग उपप्रमुख अविन दिघोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका तसेच इतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

