चंद्रपूर जिल्हातील पाच आमदारांपैकी स्थानिक रहिवासी पालकमंत्री द्या…

0
220

अन्यथा एकदिवसीय धरणा आंदोलन करणार

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर पोलीस स्टेशन रामनगर, जिल्हाधिकारी, मार्फत महाराष्ट्र राज्यपाल यांना सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूरचा माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्य़ातील स्थानिक रहिवासी महायुतीने पालकमंत्री द्यावा. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणा देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचा पावन पर्वावर हा धरणा आंदोलन करण्यात आले. महायुतीतील सरकार मधील पाच आमदारापैकी एकाला मंत्री तथा राज्यमंत्री पदी नियुक्ती करून पालकमंत्री पद देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
जर या पाच आमदार जर तुम्हाला जमत नसेल तर कॉंग्रेस चे आमदार आहेत त्यांना पालकमंत्री पद द्यावे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आमदारापैकी पालकमंत्री चंद्रपूर जिल्हयाला हवा. अशी मागणी पाईकराव यांनी रट्टुण धरली.

महायुती सरकार ने महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री / सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणे बाबत.
शासन निर्णय क्रमांकः जिपामं-१३२४/प्र क्र.४७/र.-व-का.-२,तारीख- १८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करताच
चंद्रपूर जिल्हयात खडबडी उडाली. चंद्रपूर जिल्हयात महायुती चे पाच आमदार निवडून आले असून सुद्धा चंद्रपूर जिल्हाला एक सुध्दा मंत्री पद दिले नाही.

चंद्रपूर जिल्हयात सहा विधानसभा असुन पाच विधानसभा मध्ये महायुती मधील बीजेपी चे पाच उमेदवार निवडणूक निवडुण आमदार झालेत.
1) बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सातवी वेळ विधानसभा निवडुण जिंकले
2) चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन, मा. ना. किशोरभाऊ जोरगेवार हे दुसर्‍यांदा चंद्रपूर विधानसभा मधुन निवडुण आले
3) चिमुर विधानसभा क्षेत्रातुन मा. ना बंटीभाऊ बागडिया तिसर्‍यांदा निवडुण आले
4) राजुरा विधानसभा क्षेत्रातुन मा. ना देवरावजी भोंगळे निवडून आले
5) वरोरा विधानसभा क्षेत्रातुन मा. ना. करणभाऊ संजय देवतळे निवडून आले
असे सहा विधानसभा मधुन पाच विधानसभा मध्ये महायुतीतील बीजेपी ने निवडणुकीत आपला डंका वाजवुन विजयी पथ हाती घेतले. यातच हे पाच निवडुण आलेले आमदार हे चंद्रपूर जिल्ह्य़ातील रहिवासी असून या पाच मधुन आम्हाला स्थानिक पातळीवरचा पालकमंत्री न देता यवतमाळ जिल्ह्य़ातील रहिवासी पालकमंत्री देण्यात आला आहे. हा आमच्या चंद्रपूर जिल्हावरती अन्याय झाला असुन हा अन्याय आम्ही चंद्रपूर रहिवासी सहन करणार नाही . असे सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले

आम्ही आमचा चंद्रपूर जिल्ह्य़ातील विकास कामासाठी विश्वास ठेवून महायुतीला मतदान करुन सरकार बसविले. आणि महायुतीचे सरकारचे शासन बरोबर सुरु सुध्दा झाले नाही. महायुतीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली . हे आम्ही चंद्रपूर रहिवासी सहन करणार नाही. महायुतीतील पाच बीजेपी आमदार निवडून आले असुन चंद्रपूर जिल्ह्य़ातील रहिवासी आमदाराला एकही मंत्री पद महायुती सरकार ने दिला नाही याचे विपरीत परिणाम महायुती सरकारला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मध्ये भोगावे लागणार.

आम्ही चंद्रपूर वासी महायुतीवरती विश्वास ठेवुन निवडुण दिले. आणि महायुती सरकार ने आमचा चंद्रपूर जिल्हयावरती इतका मोठा अन्याय केला.

धरणा आंदोलनाचा माध्यमातून मागणी करण्यात आली की महायुती सरकार ने चंद्रपूर जिल्ह्य़ातील पालकमंत्री पदावर घेतलेला निर्णय तत्कालीन मागे घेऊन स्थानिक पाच आमदारामधुन कोणालाही पालकमंत्री पद देण्यात यावे. तसेच एका आमदाराला मा. मंत्री तथा मा. राज्यमंत्री पद देवून चंद्रपूरला जिल्हाला न्याय देण्यात यावा.

अन्यथा आम्ही चंद्रपूर रहिवासी आमचा स्थानिकांचा हक्कासाठी
तीव्र भुमिका घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार अशा देखील यावेळेस इशारा देण्यात आला.
यावेळेस सुरेश मल्हारी पाईकराव, राकेश कातकर, अशोक भगत, शरद पाईकराव, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, राकेश पराशिवे, बबन वाघमारे, विजय कवाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here