प्रत्येक दुकानदाराने आदर्श घ्यावा – असे प्रतिपादन राष्ट्रीय गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज गणतंत्रदिवस प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 च्या निमित्ताने भारत मातेचे प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्साह मध्ये प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन साजरा करताना परभणी येथील शिवशक्ती बिल्डिंग समोरील
सप्तशृंगी पान मंदिर वसमत रोड परभणी येथे परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध योग गुरु देवतवाल चंपालाल यांनी मागील 36 वर्षापासून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणतंत्र दिन प्रजासत्ताक उत्सव 26 जानेवारी चा आपल्या सप्तशृंगी पान मंदिर येथे भारत मातेचे प्रतिमेचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करून राष्ट्रगीत भारत माता की जय वंदे मातरम घोषणा देऊन याही वर्षी उत्साह प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी उद्योजक अंगत अंभोरे अंबादास हाके देशमुख मामा नामदेव वाघ रितेश आवटे तसेच राष्ट्र जन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी भाषण करताना 26 जानेवारीला येणारा गणतंत्र प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक महोत्सव प्रत्येक दुकानदाराने व प्रत्येक आपापल्या दुकानासमोर जसं चंपालाल देवतवाल करतात तसाच प्रत्येकाने यांचा आदर्श घेतला पाहिजे म्हणून येणारा प्रत्येक 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो एक मे असो किंवा 17 सप्टेंबर असो कोण प्रत्येक दिनी हा स्वातंत्र्यासाठी व कोणत्यातरी उत्सवात आपण भारत मातेच्या अर्पणासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा उत्सव प्रत्येकाने आपल्या दुकानावर पुढच्या येणाऱ्या एकमेव च्या वेळेस साजरा प्रयत्न करावा कमीत कमी असे या प्रसंगी प्रतिपादन करण्यात आले आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक महोत्सवाचे आयोजक सप्तशृंगी पान मंदिर चे मुख्य संचालक तथा कुमावत बेलदार समाजसेवा संघ जिल्हाध्यक्ष श्री चंपालाल देवतवाल यांच्यावतीने आयोजन व प्रास्ताविक तसेच प्रत्येकांना झेंड्याचे बॅच बिल्ले वाटप करण्यात आले करण्यात आले अशी माहिती चंपालाल देवतवाल यांनी पत्रकाद्वारे दिली..

