prabodhini news logo
Home चंद्रपूर सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.

सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.

0
125

आमरण उपोषणकर्ते रमेश काळबाँधे यांच्यासह रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व इतरांनी मुंडन करुन केला निषेध.

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं जे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज दहावा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्य व आमरण उपोषणकर्ते रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी स्वतः मुंडन करुन निषेध केला आहे व त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संचालकांना इशारा दिला आहे की आज आम्ही केवळ मुंडन केलं आहे जर भरती रद्द केली नाही तर तुम्हची प्रतिकात्मक शवयात्रा काढू, दरम्यान यावेळी रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आरक्षण डावलून भ्रष्ट मार्गाने केलेल्या नोकर भरतीचा निषेध केला आहे. यावेळी समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार, सुनील गुढे, विजय तूरक्याल, पियुष धुपे, स्वप्नील देव व इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.

राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नोकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे, परंतु खासकरून सहकार विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या जिल्ह्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे आंदोलनकर्त्यानी निवेदन देऊन मागणी केली की सिडीसीसी बैंकेने आरक्षण डावलून नियमबाह्य नोकर भरती केली त्यावर स्थगिती आणा पण ओबीसीच्या हक्काच्या लढाई लढतो म्हणणाऱ्या हंसराज अहिर जे स्वतःला ओबीसी समजतात ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या लढाईला न्याय मिळवून देण्याचं काम नाही ही खरी चंद्रपूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. केवळ माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्याच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here