कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख – कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी सैनिक प्रमोद बैरागी, अकबर भाई शेख, रवींद्र गाडे या माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस ग्रामपंचायत सरपंच दिलीप छबु शेलार, उपसरपंच मुकुंदराव गाडे, सदस्य सुभाष साबळे, शरद भुसारे, भगवान गाडे, दशरथ माळी तसेच स्कूल कमिटी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद बैरागी, सर्व समिती सदस्य संदीप जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक कदम माझी सदस्य बाबासाहेब गाडे, सुनील गाडे, आरोग्य सेविका शितल जाधव, व सर्व ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी, व सोनवणे यांनी केले. सर्व पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापिका वैद्य यांनी केले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय मुला मुलींची भाषणे घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत व स्कूल व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात आले आहे त्या शौचालयाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुभाष माधव साबळे व सरपंच उपसरपंच सर्व कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले.

