जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडयाळ येथे 24 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यंत तीन दिवसीय प्रजासत्ताक महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन अड्याळ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण राज्यमंत्री तथा हनुमंत विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष विलास शृंगारपवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अड्याळ वनपरीक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक येवतकर, मधुकर निकुळे, देवाजी जांभुळकर, मुख्याध्यापक सी.एम. बावने, पर्यवेक्षक प्रशांत संतोषवार, इंजि. रोशन मोरघरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यालय शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महोत्सवानिमित्त कबड्डी,क्रिकेट, गोळाफेक, थालीफेक, वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक स्पर्धा अशा अनेक स्पर्धा विद्यालयात घेण्यात आल्या. बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष विलासराव शृंगारपवार यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंढरीभाऊ सावरबांधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन वरगंटीवर, अड्याळ ग्रामपंचायत चे उपसरपंच शंकर मानापुरे, प्राचार्य सी.एम.बावने, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, ग्रामपंचायत सदस्य आशिक अंबादे, ग्रामपंचायत सदस्य तथा सर्पमित्र आशिक नैतामे, माजी प्राचार्या मंजुषा किटे , मधुकर निकुळे, गोपाल कुंभारे, देवाजी जांभुळकर,बाळा आखरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी २०२३- २०२४ सत्रात विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत प्रथम उन्मेषा ईश्वर खंडाईत ९४%,द्वितीय जान्हवी जितेंद्र मते ९३%, बारावी परीक्षेत कला शाखेत प्रथम कु. गाडेकर ८५% वाणिज्य शाखेत प्रथम विश्वजीत झलके ८३% व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार व प्रजासत्ताक महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आय.एच. खंडाईत तर आभार के. बी. गायधने यांनी मानले. प्रजासत्ताक महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

