शर्मिष वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली- गडचिरोली: आज 26 जानेवारी 2025 ला 76 वा प्रजासत्ताक दिवस स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अजय लांडगे, उपप्राचार्य शैलेश आकरे ,एस.एम.सी, पी.टी.एई मेंबर्स, पालक वर्गाची उपस्थिती होती.
प्राचार्य अजय लांडगे व शैलेश आकरे व प्रमुख अतिथींच्या द्वारे स्वतंत्र भारताचे सूत्रधार राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगान घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेशभूषेत देशभक्तीपर गीतांवर समूह गायन, समूहनृत्य सादरीकरणाने शाळेचे वातावरण भक्तिमय झाले होते तसेच वार्षिक उपक्रमात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व पालक वर्गाला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका शिल्पा भैसारे व सोनाली बोंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिल्पा गुडडेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संगीत विभाग, क्रीडा विभाग ,कला विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

