कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे – दिनांक 26-01-2025 कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी प्रतिष्ठान फार्मर्स डेन पब्लिक स्कूल येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ज्यांच्या संकल्पनेतून श्रीराम सृष्टी प्रकल्प निर्माण झाली. अशी व्यक्तिमत्व सचिन यशवंतराव राऊत सर(RSS ) सदस्य यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची पूजा करण्यात आले .तसेच फार्मर्स डेन पब्लिस स्कूल चे चेअरमन. पंडितराव चांदगुडे यावेळेस उपस्थित होते . या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान सौ बोरवके मॅडम. प्रिन्सिपल सौ माधुरी मॅडम. उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान छोट्याशा. मुलांनी खूप छान पद्धतीने डान्स. संविधानावर पथनाट्य संभाषण सादर केले.
या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे सचिन राऊत सर बोलताना म्हणाले की छोट्याशा मुलांनी खूप छान पद्धतीने डान्स केले त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी या वयातच मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यासाठी त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. तसेच आपला परिसर देशात श्रीराम सृष्टी नावाने धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे तरी आपण सर्व स्कूलमध्ये रामायणातील प्रसंग दाखवणारे व्यक्तिरेखा आपण कार्यक्रमांमध्ये सादर करावे राम सीता लक्ष्मण यांची छोटी छोटीशी पात्र विद्यार्थ्यांना द्यावी व सादरीकरण करावे असे प्रमुख पाहुण्यांनी म्हटले. तसेच या कार्यक्रमादरम्यान फार्मर्स देन स्कूलचे चेअरमन पंडितराव यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनीही आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले. त्यावेळेस रवींद्र चांदगुडे. विश्वासराव गाडे. सचिन चांदगुडे (माजी सरपंच) रवि चांदगुडे. सुरेश कोंडे. शेवाळे अण्णा. मच्छिंद्र चांदगुडे (गोदावरी पतसंस्था चेअरमन). सर्व ग्रामपंचायत सदस्य. श्रीराम सृष्टी सेवाभावी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. व तसेच विजय काळुंगे. बिपिन भारती. मिलिंद आहेर. मनीषा वाणी. विशाखा बडवर. देवरे. माधुरी बोडके. उन्हाळे. तीरसे. वैशाली वाणी. निरभवणे शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले.

