एकारा येथे गणतंत्र दिनानिमित्त एकारा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज 7588790053 – ब्रम्हपुरी गणतंत्र दिनाच्या औचित्य साधुन एकारा येथे २७ जानेवारी ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकाराच्या वतीने एकारा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या देशभक्तीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव देने तसेच देशाच्या संविधान दिनाचे महत्व , इतिहास विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आले. लहान मुलांना संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. हे सण विद्यार्थ्यांमध्ये समाजाची भावना निर्माण करण्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देण्यासही मदत करतात व अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. असे मत माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने गणतंत्र दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या *कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.* यावेळी कार्यक्रमाचे. सत्कारमूर्ती, नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली -चिमुर लोक.क्षेत्र, उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून थानेश्वर कायरकर मा.जि.प. सदस्य ब्रम्हपुरी, हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मणुन.हरीचंद्र गेडाम सरपंच एकारा,उपाध्यक्ष म्हणून.मिलींद कुरसुंगे विस्तार अधिकारी ब्रम्हपुरी,तर प्रमुख अतिथी म्हणून दिपक कुंमरे सरपंच किटाळी,अशोक बोरकर ग्रा.प.सदस्य,एकारा,हर्षद भैसारे उपाध्यक्ष शा.व्य.स.एकारा, रणजीत कसारे इंजिनीयर पं.स.ब्रह्मपुरी, छाया भैसारे मा.अ.तं.मु.स.एकारा, गुरुदेव देशमुख मा.अ.शा.व्य.स.एकारा, सविता बन्सोड ग्रा.प. सदस्य. एकारा, संध्या कोराम ग्रा.प.सदस्य. एकारा, कु.चांभारे पो.मा.पेडगाव,साईकिरण पो.मा.एकारा,यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये गावातील लहान मुलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. गावातील जनतेने त्यांच्या कलागुणांना दाद देत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकारा , च्या सर्व शिक्षक वृंद व गावकरी यानी अथक परिश्रम घेतले.

