जयेंद्र चव्हान
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे दि. 26 जानेवारी 2025 ला 76 वा प्रजासत्ताक दिन (संविधान अमृत महोत्सव वर्ष) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरडकर ह्या होत्या.विशेष अतिथी म्हणून ग्राम पंचायत सदस्या शिल्पा गभणे,शिक्षणतज्ञ तथा माजी मुख्याध्यापक भाऊराव हुमणे उपस्थित होते.तर प्रमुख अभियानय् म्हणून माधुरी मुंडले, माधुरी मोटघरे,जगदीश विणकणे,विनेश मारबते,पूजा मानापुरे आदी मान्यवर मंडळी हजर होती.
ह्यावेळी शिल्पा गभणे यांचे हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमांचे त्याचप्रमाणे ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीत,राज्यगीत ह्यासोबतच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.शालेय विद्यार्थिनींनी विविध राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्यांचे सादरीकरण केले.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी,शालेय विद्यार्थिनी त्याचप्रमाणे ग्रामवासी यांची उपस्थिती होती.

