वरखेडा विद्यालयात महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न….

0
29

वरखेडा विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव स्तुत्य- संचालक प्रविण (नाना) जाधव

मराठा मराठा विद्या प्रसारक विद्या प्रसारक

जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502- समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बालविकास मंदिर वरखेडा विद्यालयांमध्ये सन 2024-25 या वर्षाचा महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निफाड तालुक्याचे संचालक शिवाजी गडाख साहेब यांनी,’आपल्या भाषणामध्ये सांगितले की,’वरखेडा विद्यालयाचा हा सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी प्रेरणादायी असून त्याचा विकास हाच खरा शाळेचा विकास आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म.वि.प्र.समाज संस्थेचे दिंडोरी तालुक्याचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी वरखेडा विद्यालय नेहमीच विविध उपक्रम घेवून विद्यार्थी कलागुणांना वाव देते.विद्यालयाने अनेक प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन सामाजिक शैक्षणिक बरोबर सांस्कृतिक ठेवा ही जपला आहे.असे सांगितले.
सांस्कृतिक महोत्सवाचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे साहेब निफाड तालुक्याचे संचालक शिवाजी आप्पा गडाख,देवळा तालूका संचालक विजय नाना पगार,नांदगाव तालुका संचालक अमित जी बोरसे साहेब व दिंडोरी तालुक्याचे संचालक प्रवीण नाना जाधव, शालेय समिती अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ, अभिनव बालविकास मंदीरचे अध्यक्ष प्रभाकर उफाडे, वरखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दशरथ (DS)उफाडे, सहकार नेते सुरेश डोखळे,नंदकुमार काळोखे,सोसायटी माजी चेअरमन दत्तात्रय उफाडे,वरखेडा गावचे लोकनियुक्त सरपंच केशवराव वाघले, वरखेडा गावचे उपसरपंच राजेंद्र उफाडे, वरखेडा गावचे पोलीस पाटील कैलास बलसाने, मुख्याध्यापक नितीन भामरे, वरिष्ठ लिपिक कैलास उगले,सदस्य पदमाकर दादा वडजे,सुभाष दादा वडजे,गोविंद गडकरी काशिनाथ उफाडे, गणपत भुसाळ,विजय काका देशमुख,जयराम उफाडे, आंबेवणी सोसायटीचे चेअरमन अशोक दादा वडजे, वडाळी भोई विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप उफाडे, माजी. मुख्याध्यापक संजय उफाडे,परमोरी सोसायटीचे मा.चेअरमन केशवराव शिवले, हिरामण शिवले, विजय काळोगे,संतोष उफाडे, परशराम उफाडे,आदिनाथ पडोळ,प्रमोद भुसाळ, जगदीश वडजे,मयूर भुजाडे आदी सदस्य माता पालक यांनी पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रवेशद्वारा पासून विद्यालयातील लेझीम पथकाने केले.
पूजन झाल्यानंतर सांस्कृतिक महोत्सवासाठी परिश्रम घेणारे नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) शैलेश कटारे,साक्षी पगारे आदींचा पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अभिनव बालविकास मंदिर मधील चिमुकल्यांनी नृत्यातून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये नर्सरीच्या चिमुकल्यांनी गणपती वंदना ने सुरुवात करून ज्युनिअर केजीच्या लहान मुलींनी “जोगवा वाढ ग माऊली…! या गाण्यावर तसेच ‘तेरी झलक शरफी,आदिवासी तारपा नृत्य, कोळीगीत,आदी सह 10 गाण्यांवर नृत्य करून सर्वांची मने जिंकली. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयातील आईचा गोंधळ,जन्म बाई चा बाईच खूप घाईचा,तसेच शिवाजी महाराजांचे राजे आले राजे आले,आर्मी डान्स, मोबाईल दुष्परिणाम दर्शवणारी नाटिका… अशा प्रकारचे एकूण १२ नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या महोत्सवात “कांतारा आणि महिषासूर मर्दीनी कालिका अवतार सुंदर वेशभूषेत गाण्यावर बघावयास मिळून ते कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
सांस्कृतीक महोत्वानिमित्त वरखेडा गावातील आदर्श ईश्वरी डेअरी फार्म अंतर्गत जालिंदर भाऊ उफाडे यांनी विद्यालयातील सर्व 750 विद्यार्थी शिक्षकांना जेवणाची उत्तम व्यवस्था करून “अन्न हे पूर्ण ब्रह्म…. ची प्रचिती आणून दिली.याबद्दल वरखेडा गाव परिसरातून उफाडे परिवाराच्या दानत्वाचे कौतुक होतं आहे.
म.वि.प्र.संस्थेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झालेले वरखेडा गावचे श्रीनिवास पुंजाजी उफाडे पाटील यांनी स्टेजवरील डायस टेबलसाठी 10,000 रुपयांची मदत केली.
वरखेडा गावच्या आदर्श कन्या,केटीएचएम (KTHM) महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कै. रुक्मिणी वसंतराव उफाडे यांच्या स्मरणार्थ डायस टेबल पांडुरंग उफाडे यांच्या वतीने विद्यालयास भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रम दुसऱ्यांदा दिवसरात्र असल्याने लाईटच्या जगमग प्रकाशात आणि थिरकणाऱ्या पावलांना बघण्यास वरखेडा आंबेवणी,राजापूर घोडेवाडी, करंजी, कोंबडवाडी, परमोरी, ओझरखेड, आदी परिसरातून पालक माता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन भामरे, वरिष्ठ लिपिक कैलास उगले सांस्कृतिक कमिटी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नरेंद्र वड, अलका शिंदे, सविता भोये यांनी संयुक्त पणे केले तर आभार उपशिक्षिका मनिषा उफाडे यांनी मानले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here