prabodhini news logo
Home ठळक बातम्या अड्याळ चे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर लावलेले आरोप निष्कासित

अड्याळ चे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर लावलेले आरोप निष्कासित

0
221

उपविभागीय अभियंता सा. बां. उपविभाग जि. प. भंडारा यांनी दोषमुक्त कामाची पाहणी करून दिला सकारात्मक अहवाल

जयेंद्र चव्हाण
विशेष जिखा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असून सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे स्वतः ठेकेदारी करत असल्याने सुरू असलेल्या विकास कामाची सखोल चौकशी करून दोषी सरपंच व ग्राम विकास अधिकारी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र / तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा तसेच खंडविकास अधिकारी पवनी यांना दिले होते. विरोधकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महेश परदेशी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी अड्याळ ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या बांधकामाच्या तक्रारीची सखोल चौकशी करून दोषमुक्त सकारात्मक अहवाल सादर केला . सकारात्मक अहवालाचे प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद भंडारा , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद भंडारा तसेच कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद भंडारा , खंडविकास अधिकारी पंचायत समिती पवनी यांना दिलेला आहे.
सकारात्मक तपासणी अहवाल पुढील प्रमाणे आहे.
अड्याळ ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध योजनेंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे होत असून सरपंच व सचिव हे स्वतः ठेकेदारी करत असल्याने सुरु असलेल्या विकास कामाची सखोल चौकशी करून दोषी सरपंच , सचिव यांचेवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार प्राप्त झाली होती.
संदर्भ :- पंचायत समिती पवनी चे पत्र क्र / पसप/आस्था/डे १/१९३/२५ दि १०/०१/२०२५
वरील संदर्भीय तक्रारीच्या अनुशंघाने दि 15/०१/२०२५ रोज बुधवारला ग्रामपंचायत अड्याळ येथे भेट दिली त्यावेळी सरपंच शिवशंकरजी मुंगाटे, उपसरपंच शंकरजी मानापुरे, सचिव श्रीमती साखरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
तक्रारीत नमूद कामानुसार सुभाष गभणे ते कुशन गभणे नाली बांधकामाची पाहणी करण्यात आली. अंदाजपत्रकाप्रमाणे सदर बांधकामामध्ये खोदकाम 80 MM से मी, 80 MM solling 10 से मी, M10 10 से मी ,face wall 50 से मी उंच व 15 से मी रुंद, steel 18 kg/cum face wall साठी wearing course ८ से मी, आणि नाली कवर 10 से मी जाडी व ८० से मी रूंदी प्रस्तावित आहे.
कामावर पाहणी केली असता 80 MM 10 सेमी, M10 10 सेमी, wearing course उतारानुसार ७-८ से मी दिसून आली face wall 50-55 से मी उंच व 15 से मी रुंद, तसेच steel खालीलप्रमाणे दिसून आले. 1 cum concrete मध्ये 5 m नाली face wall व wearing course चे बांधकाम होते. त्यामध्ये तक्रारदार यांचे मागणीनुसार 1m नाली बांधकाम तोडून सर्वांसमक्ष तपासणी करण्यात आली त्यामध्ये खालीलप्रमाणे steel दिसून आले.
Longitudinal 7 bar 8 mm size -7 nos* length 5 m*.39 13.65 kg
U shape bar spacing 0.25 m to 0.4 m 12 1.60 m length *.39 7.48 kg
(maximum 0.4 m spacing नुसार 5 m मध्ये 12 no)
एकूण 21.37 kg
वरीलप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार 18 kg/cum आवश्यक आहे, त्यानुसार 21.37 kg/cum steel वापरण्यात आले आहे. तसेच वरीलप्रमाणे आढळलेल्या कमाल अंतरानुसार बांधकाम झालेल्या ७५ m नालीमध्ये ३२०.५५ kg steel वापरण्यात आले अंदाजपत्रकानुसार ते ७५ नालीसाठी २७० kg प्रस्तावित होते. त्यामुळे झालेल्या कामामध्ये अंदाजपत्रकानुसार परिमाणामध्ये steel वापरण्यात आले आहे. झालेले नाली कवर चे कामामध्ये 10 सेमी जाडी व आवश्यकतेनुसार ८० से मी रूंदी दिसून आली.
तसेच तक्रारीमध्ये नमूद इतर स्थळामध्ये गिरडकर ते राहुल फटिक, राजू पवार ते गोपाल ढोक. नागपुरे ते निकुले वरीलप्रमाणेच काम झाल्याचे दिसून आले. नालीची उंची पाण्याचा निचरा होण्याकरिता अस्तित्वात असलेल्या नालीच्या उतारानुसार व रस्त्याच्या उंचीनुसार ४० सेमी ते ६० सेमी असल्याचे दिसून आले. गुजरी चौक येथील भाजीपाला दुकानाकरिता ओटे बांधकामामध्ये काम plingth लेवल पर्यंत झाले असून अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असल्यानुसार ०.२३००.२३ चे 20 collumn तसेच ०.२३००.२३ चे beam चे काम झाले आहे. जागेच्या सरचनेनुसार brickwork & m १ m उंची पर्यंत झाले आहे प्रस्तावित ओट्यांची आकारमानानुसार 5m 15m करण्यात आले आहे. त्यामुळे सदर काम अंदाजपत्रकानुसार सुरु आहे.
तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे नमुना १९ व नमुना 15 ची तपासणी केली असता आतापर्यंत झालेल्या कामानुसार मजुरांच्या व साहित्याच्या नोंदी घेतल्याचे दिसून येत आहे. उर्वरित नोंदी कामानुसार पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष दिलेला आहे.
याप्रमाणे वरील संदर्भीय कामांची दि 15 जानेवारी 2025 ला वास्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली आणि त्याप्रमाणे कोणतीही प्रकारची अनियमितता दिसून आली नाही, सर्व कामे अंदाजपत्रकाप्रमाणे स्थळावर असून तांत्रिक दृष्टीने स्टील, सिमेंट, इत्यादी साहित्याचे वापराचे प्रमाण तसेच बांधकामाचा दर्जा इ. बाबी निकषाप्रमाणे आहेत तसेच नमुना क्र 15 व 19 वर मजूर व साहित्याच्या नोंदी घेतलेल्या असून उर्वरित नोंदी झालेल्या कामानुसार पूर्ण करून घेण्याचे निर्देश ग्रामपंचायत अड्याळ ला देण्यात येत आहेत. समोरील कामांचे संदर्भात ग्रामपंचायत अड्याळ ला निर्देश देण्यात येत आहेत कि स्टील चे अंतर (SPACING) सबंधित शाखा अभियंता / उपविभागीय अभियंता यांना विचारून व उपयोगात आणणारे साहित्य इ. LAB टेस्टिंग करून घेण्यात यावे व बांधकामाबद्दल तात्रिक दृष्टीने गांभीर्य घेऊन कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावी. उर्वरित मुद्दे या विभागाशी सबंधित नाही. अशा प्रकारे घड्याळ ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर लावलेले आरोप निष्काशीत करण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here