ग्यानचंद ताराचंद जांभूळकर भंडारा यांचे जनप्रबोधन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
9665175674
भंडारा – जगात कुठेही भुताचे अस्तित्व नाही. जगात भूत नाही. या सर्व काल्पनिक आभास आहे. जर जगामध्ये भूत असता तर सर्वप्रथम डॉक्टर्स व नर्स यांना झोंबला असता असे प्रतिपादन ग्यानचंद जांभूळकर यांनी पांजरा (बोरी) येथे पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी वीरेंद्र रंगारी (पालोरा) हे होते .
दिनांक 3 फेब्रुवारी 2025 ला स्मृतीशेष गोवर्धन बडगे यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये ग्यानचंद जांभूळकर बोलत होते . ते पुढे म्हणाले की जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक चक्र आहे जर पृथ्वीवरील सजीवांचे मृत्यू थांबले तर जगाचे व्यवहार थांबून जातील पृथ्वी चालणारच नाही.
जगातील सजीव प्राण्यांचा देह हा पृथ्वी, आप, तेज आणि वायू ह्या नैसर्गिक चार घटकांपासून बनलेला आहे .काही धर्मातील लोक पाच घटक मानतात व तो पाचवा घटक म्हणजे आकाश. आकाश हा अस्तित्वात नाही. आपल याला वरती जे दिसते ते अशी कोणतीही वस्तू नाही. आकाशाचा अनुभव घेता येत नाही. त्याला स्पर्श करून येता येत नाही. आकाश म्हणजे विश्व आहे .विश्व म्हणजे आपल्या सभोवती असलेली अनंत पोकळी आहे. ती अजूनही कोणत्याही शास्त्रज्ञांना मोजताआलेलं नाही .
जीव मेल्यानंतर माणूस ज्या चार घटकांचा बनलेला आहे ते चार घटक कमी अधिक काळामध्ये निसर्गाच्या चार घटकांमध्ये मिसळून जातात. बाकी काहीही उरत नाही. ज्या लोकांचा आकाश या घटकांवर विश्वास आहे.त्यांचा आत्म्यावर विश्वास असतो व ज्यांचा आत्म्यावर विश्वास आहे त्यांचा भुतावर विश्वास असतो. इथेच फार मोठी गडबड झालेली आहे .
माणूस जर भूत बनला असता तर असंख्य पेशंट डॉक्टर कडे दवाखान्यात भरती झालेले असतात. काही काही डॉक्टर लोक मुद्दामहून पेशंटचे बिल वाढलं पाहिजे व स्वतःचा फायदा झाला पाहिजे यासाठी पेशंटला चुकीची वागणूक देतात व पेशंट गेल्यानंतरही सांगत नाही.. पेशंटचे खूप हाल हाल होतात अशा वेळी रुग्ण दगावतो . माणूस भूत झाला झाला असता तर सर्वप्रथम ज्या डॉक्टरने व ज्या नर्स ने त्यांचे हाल हाल केलेले आहे त्या डॉक्टरांना व त्या नर्सला तो माणूस भूत होऊन झोंबला असता .
पण आजपर्यंत असे कुठे घडलेले नाही. कोणत्याही डॉक्टरांना व नर्स यांना भूत झोंबलेले आपण ऐकले नाही किंवा वाचलेले नाही. ज्याच्या मेंदूमध्ये भूत आहे त्यांचा विश्वास भुतावर आहे त्यांना तो झोंबत असतो .
बरं माणूसच भूत का होतो? मग या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव मरतो ते सर्व भूत व्हायला पाहिजे बाजाराच्या दिवशी खाटीक लोक बकरे कापतात कोंबड्यांचा धंदा करणारे लोक असंख्य कोंबड्यांचा धंदा साठी बळी देतात. मग एखादा बकरा, बकरी किंवा कोंबडी भूत बनवून त्या खाटीकच्या किंवा कोंबडीच्या धंदेवाल्या व्यक्तीला भूत म्हणून झोंबलेले आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे .
भुताचे अस्तित्व आहे म्हणणे हे सर्व नकली बुवा, बाबा, बापू, हापू, टापू खिसे कापू यांचे पोट भरण्याचे धंदे आहेत. म्हणून प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या डोक्यांमध्ये ठेवायला पाहिजे.
आपल्या तीन तासाच्या कार्यक्रमांमध्ये जांभूळकर यांनी महापुरुष संत यांचे विचार मांडले. तसेच पर्यावरण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा यावरही प्रकाश टाकला. नकली बाबा कसे फसवतात हे प्रतिपादन करताना त्यांनी काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले जसे हातावर कापूर जाळणे व जिभेवर घेणे, सायकलचे स्पोक जिभे मध्ये आरपार टोचने ,नारळा मधून वस्तू काढणे, लिंबू मधून रक्त काढणे इत्यादी .
कार्यक्रम लोकरंजक करण्यासाठी त्यांना बब्बू मिया शेख, प्रभाकर तेलंग, गिरीश महाजन, प्रिया शहारे ,मानसी रंगारी आदी कलाकार मंडळींनी सुंदर साथ दिली.

