ब्रम्हपुरी येथे आ.वडेट्टीवार यांचा सपत्नीक सत्कार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
समाजातील शेवटच्या घटक असलेल्या माणसाला सर्वतोपरी मदत करून, रंजल्या गांजलेल्याची सेवा करणे हा मानव धर्म आहे. मी माणसात देव शोधतो व त्यामुळेच माणसाच्या सेवेतुन मला खरा आनंद मिळतो असे मौलिक विचार महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
ब्रम्हपूरी शहरातील धुम्मनखेडा प्रभागातील अष्टविनायक गणेश मंदिर समीतीच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर सौ.किरण विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, किशोर आमले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुभाऊ सोंदरकर, माजी नगरसेवक जगदीश आमले, योगेश मिसार, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, माजी नगरसेविका सरीता पारधी, माजी नगरसेविका निलीमा सावरकर, माजी नगरसेविका वनिता अलगदेवे, ताराचंद झुरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपूरी शहरात आरोग्याच्या सुविधा मुबलक करण्यासाठी शंभर खाटांच महीला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी मी प्रयत्नरत असुन लवकरच या रुग्णालयाला मंजुरी मिळणार आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब माणसाचा वैद्यकीय उपचार व्हावा यासाठी मी स्व:पैशातुन खर्च करत असतो. यातुन मला पुण्य कमावल्याचा समाधान मिळत असतो. एक लोकप्रतीनीधी म्हणून मी सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन रवी पारधी यांनी केले.

