मागील दहा वर्षांचा फोटो पाहताना,
विचारांचं गाठोडं मनात उलगडताना,
काय मिळवलं, काय गमावलं,
स्वतःला नव्याने समजून घेत गेलो.
स्वतःच्या फायद्यासाठी कधीच पाऊल नाही टाकलं,
समाजहितासाठी मात्र धैर्यानं पुढं झालो,
स्वार्थ जरी होता, तोही होता समाजासाठी,
चुकांमधून शिकत राहणं हेच ठरवलं मनासाठी.
चुका केल्या, त्या स्वीकारल्या,
चुकांमधूनच नवीन वाटा शोधल्या,
जो चुकत नाही, तो काहीच शिकत नाही,
म्हणूनच प्रयत्न करणं कधीच थांबवलं नाही.
नियम आणि तत्त्वं हीच माझी काठी,
जीवनाला मार्ग दाखवणारी माझी साथी,
गुरु माझे मित्र, मार्गदर्शक आणि आधार,
त्यांच्यासोबत राहणं हेच माझं भाग्यसार.
नवयुवकांकडून शिकतो नवं काहीतरी,
वयोवृद्धांकडून अनुभवाचा गोडवा घेतो खरी,
सर्व विषयांवर वाचन, अभ्यास आवडतो,
त्या ज्ञानातून समाजाज्ञान देणं मला आवडतो.
संस्कार मिळाले सुसंस्कृत शिक्षकांमार्फत,
प्रा. हिमते सर माझ्यासाठी चाणक्यवत,
जगण्याला आकार दिला पारसाच्या स्पर्शातून,
दगडासारखा होतो मी कधी काळी,
पण ज्ञानाने मला रंगरूप मिळाले खरी.
प्रत्येकजण शोधतो माझ्यात चांगल्या-वाईट गोष्टी,
पण सांगतो मी, मी आहे एक विद्यार्थी,
चुका करणार, शिकणार, प्रयत्नशील राहणार,
जीवनात नव्या दिशेने चालत राहणार.
जीवनात अर्थ आणि वाणिज्य शिकतो,
परिस्थितीचं ज्ञान नव्या पिढीला देतो,
ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःला शोधत आहे,
समाजासाठी काहीतरी चांगलं करत आहे.
कवी डॉ. चेतन हिंगणेकर
एनसीसी अधिकारी सी. पी अँड बेरार महाविद्यालय तुळशीबाग नागपूर. विज्युक्टा नागपूर शहर अध्यक्ष विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूर, सचिव.

