पोलिस अमलदार महेश कवडू नागुलवार यांना विरगती प्राप्त

0
297

गडचिरोली प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस स्टेशन अंतर्गत दिरंगी व फुलणार गावात आज दि.११ फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार,विशेष अभियान पथक सी-६० गडचिरोली,वय- ३९ वर्षे, रा- अनखोडा,ता.चामोर्शी,जि. गडचिरोली हे जखमी झाले होते.
त्याना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्य संस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here