कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ७६२०२०८१८०,९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे गोदावरी विकास प्रतिष्ठान च्या फार्मर इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक१५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय आशुतोष काळे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुलजी दवंगे यांनी गोदावरी विकास प्रतिष्ठान निर्मित फार्मर टेन पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष पंडित चांदगुडे यांच्या विनंतीला मान देऊन स्नेहसंमेलनाला येऊन कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली या स्नेहसंमेलना त माननीय आमदार आशुतोष काळे यांनी खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी पब्लिक स्कूलची गरज होती आणि ती फार्मर डेन पब्लिक स्कूल च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष पंडित यांनी पूर्ण केली त्यांना काही उणीव वाटल्यास आम्ही त्यासाठी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन त्यांनी दिले तसेच या पब्लिक स्कूलच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार इंग्लिश मीडियम चे शिक्षण मिळत असल्याने या संस्थेने आज सात वर्ष पूर्ण केलेले आहे यामुळे सर्व पंचक्रोशीतील पालक वर्ग आनंदी आहेत अशी चर्चाही संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले. सातव्या स्नेहसंमेलनानिमित्त पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छान असा सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरा केला यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे या स्नेहसंमेलनासाठी चाचणी व पंचक्रोशीतील सर्व राजकीय नेते पालक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस शाळेतील विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे सत्कार समारंभ पत्रकारांचे सत्कार समारंभ याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोदावरी विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त रविराज चांदगुडे, युवराज चांदगुडे, माधुरी युवराज चांदगुडे पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अर्चना बोरावके यांनी सर्व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना सन्मानचिन्ह दिले व शेवटी सर्वांचे आभार मानले..

